NHM Pune Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), पुणे परिमंडळ अंतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून ही संधी 12वी, डिप्लोमा, फार्मसी, पदवीधर उमेदवारांसाठी आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्याची उत्तम आहे. एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹17,000 ते ₹20,000 पर्यंत मानधन मिळणार आहे. ही भरती 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे. उमेदवाराचे वय 43 वर्षांपर्यंत असावे व संबंधित शैक्षणिक पात्रता तसेच अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2025 आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान भरतीची मुख्य माहिती
भरती संस्था : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), पुणे परिमंडळ
नोकरी प्रकार : कंत्राटी आरोग्य विभागातील सरकारी नोकरी
एकूण पदसंख्या : 03
शैक्षणिक पात्रता : 12वी / डिप्लोमा / फार्मसी / इतर (सविस्तर जाहिरात पहावी)
वेतनश्रेणी : ₹17,000 ते ₹20,000 दरमहा
वयोमर्यादा : कमाल 43 वर्ष
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : फक्त ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 जुलै 2025
पदनिहाय तपशील
औषध निर्माण अधिकारी (Pharmacist)
शैक्षणिक पात्रता: D.Pharm / B.Pharm, MS-CIT अनिवार्य
अनुभव: NHM / सरकारी क्षेत्रात अनुभवास प्राधान्य
समुपदेशक (Counsellor)
पात्रता: सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र पदवी
प्राधान्य: पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा, NTEP अनुभव, संगणक ज्ञान
एक्स-रे टेक्निशियन (X-Ray Technician)पात्रता: १२वी नंतर रेडिओलॉजी / एक्स-रे डिप्लोमा (UGC मान्यताप्राप्त संस्थेतून)
अन्य महत्वाची माहिती
ही पदे पूर्णपणे कंत्राटी स्वरूपातील असून, कोणत्याही प्रकारे शासकीय सेवा नियम लागू होणार नाहीत.
निवड झालेल्या उमेदवारास ११ महिने २९ दिवसांची कंत्राटी नियुक्ती दिली जाईल.
अर्जदार हा मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
उमेदवाराविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसावा.
अनुभव व उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य दिले जाईल.
गुणवत्ता यादी व इतर माहिती nhm.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
महत्वाची सूचना: उमेदवारांनी भरतीसंदर्भातील संपूर्ण अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. चुकीच्या माहितीमुळे झालेल्या नुकसानास भरती प्रक्रिया जबाबदार राहणार नाही.
Disclaimer: वरील माहिती ही अधिकृत जाहिरातीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही कारणाने झालेल्या त्रुटींसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.
FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1: या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
12वी, डिप्लोमा, D.Pharm/B.Pharm, संबंधित विषयातील पदवीधर उमेदवार पात्र आहेत.
प्रश्न 2: भरतीची प्रक्रिया कशी आहे?
भरती प्रक्रिया फक्त ऑफलाईन अर्जावर आधारित असून गुणवत्ता यादी व अनुभवावर आधारित निवड होईल.
प्रश्न 3: ही नोकरी कायम स्वरुपाची आहे का?
नाही, ही कंत्राटी नोकरी असून ११ महिने २९ दिवस कालावधीची आहे.
प्रश्न 4: अर्ज कधीपर्यंत करता येईल?
२४ जुलै २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
प्रश्न 5: अर्ज पाठवण्यासाठी कोणता पत्ता आहे?
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळ, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, विधान भवन समोर, पुणे – 411001
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |