ECHS Pune Bharti 2025 नमस्कार मित्रांनो, माजी सैनिक कर्मचारी आरोग्य योजना (ECHS) अंतर्गत पुणे येथे विविध पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून “वैद्यकीय तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, दंत सहाय्यक, नर्सिंग सहाय्यक, लिपिक व डेटा एंट्री ऑपरेटर, चौकीदार, सफाई कामगार” या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
अर्ज प्रक्रिया ऑफलाइन असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 जुलै 2025 आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार असून त्याचे आयोजन 25 जुलै 2025 रोजी करण्यात आले आहे. खाली भरतीबाबत सविस्तर माहिती दिली आहे:
भरती तपशील
संस्था: ECHS माजी सैनिक कर्मचारी आरोग्य योजना, पुणे
पदसंख्या: एकूण 09 जागा
भरती प्रक्रिया: थेट मुलाखत
पद व पात्रता तपशील
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
वैद्यकीय तज्ञ | MD/MS किंवा संबंधित विषयात DNB |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
प्रयोगशाळा सहाय्यक | DMLT किंवा Class 1 Laboratory Tech Course |
दंत स्वच्छता तज्ञ/सहाय्यक | Diploma in Dental Hygienist किंवा Armed Forces Class-1 कोर्स |
नर्सिंग सहाय्यक | GNM डिप्लोमा / Armed Forces Class-1 कोर्स |
लिपिक व डेटा एंट्री ऑपरेटर | पदवीधर किंवा Armed Forces Class-1 Clerical कोर्स |
चौकीदार | किमान 8 वी पास किंवा GD ट्रेड |
सफाईवाला | साक्षर (Literate) |
नोकरीचे ठिकाण पुणे, महाराष्ट्र
वेतनश्रेणी
पद | मासिक वेतन |
---|---|
वैद्यकीय तज्ञ | ₹1,00,000 |
वैद्यकीय अधिकारी | ₹75,000 |
प्रयोगशाळा सहाय्यक | ₹28,100 |
दंत सहाय्यक/तंत्रज्ञ | ₹28,100 |
नर्सिंग सहाय्यक | ₹28,100 |
लिपिक व डेटा एंट्री ऑपरेटर | ₹16,800 |
चौकीदार | ₹16,800 |
सफाईवाला | ₹16,800 |
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 जुलै 2025
मुलाखतीची तारीख: 25 जुलै 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता: OIC, Station HQ (ECHS Cell), Pune
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याआधी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
कोणतीही माहिती चुकीची भरल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
देय तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
संबंधित पदासाठी पात्र उमेदवारांनी 25 जुलै 2025 रोजी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित रहावे.
अधिक माहितीकरिता PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
महत्वाची सूचना
सर्व उमेदवारांनी भरतीपूर्व माहिती स्वतः वाचून खात्री करूनच अर्ज सादर करावा. अर्ज करताना कोणतीही चूक झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | www.echs.gov.in |