RRB Bharti 2025 रेल्वे विभागात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो उमेदवारांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती मंडळ (RRB) ने 6238 टेक्निशियन पदांची भरती प्रक्रिया 2025 साठी सुरू केली असून, यासाठी पात्र उमेदवारांना 28 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
ही भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय रेल्वेत होणार असल्याने नोकरीची स्थिरता, चांगला पगार, सुविधा आणि भविष्याची सुरक्षितता या दृष्टीने ही एक सुवर्णसंधी मानली जाते.
एकूण पदसंख्या: 6238 ही पदं RRB च्या विविध झोनमध्ये विभागली गेली असून उमेदवारांना भरती प्रक्रियेतील झोन निवडण्याची संधी दिली जाते.
पदांचे तपशील व शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन ग्रेड I (सिग्नल) – 183 पदे
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Sc (Physics / Electronics / Computer Science / IT / Instrumentation)
किंवा संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा
टेक्निशियन ग्रेड II: 6055 पदे
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण (NCVT/SCVT मान्यता आवश्यक)
उदाहरणार्थ: Electrician, Fitter, Welder, Wireman, Plumber, Diesel Mechanic, Electronics Mechanic, Machinist, Turner, Painter, Carpenter, Mechanic Auto Electricals, Refrigeration & AC Mechanic, इत्यादी (तपशील जाहिरातीत)
वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी):
किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 33 वर्षे
सवलती:
SC/ST: 5 वर्षे
OBC: 3 वर्षे PwD व Ex-Servicemen साठी अतिरिक्त सूट लागू
परीक्षा शुल्क: सामान्य / OBC / EWS: ₹500/- SC / ST / महिला / ExSM / ट्रान्सजेंडर / EBC: ₹250/-
(टीप: परीक्षा दिल्यास काही रक्कम परत मिळू शकते)
पगार श्रेणी:
लेव्हल-2 (ग्रेड III): ₹19,900/-
लेव्हल-5 (ग्रेड I): ₹29,200/-
तसेच महागाई भत्ता (DA), HRA, ट्रॅव्हल अलाउन्स, मेडिकल बेनिफिट्ससारख्या केंद्र सरकारी सुविधा लागू होतात.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतात उमेदवाराची निवड झाल्यानंतर झोननुसार पोस्टिंग दिली जाते.
अर्ज करण्याची पद्धत:
फक्त ऑनलाईन अर्जच स्वीकारले जातील
www.rrbcdg.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करा
अर्ज करताना तुमचा फोटो, सही, ITI किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र व ईमेल/मोबाईल नंबर तयार ठेवा
महत्वाच्या तारखा:
अर्ज सुरू: 15 जुलै 2025 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जुलै 2025
CBT परीक्षा तारीख: लवकरच जाहीर केली जाईल
निवड प्रक्रिया कशी असेल?
- CBT (Computer Based Test)
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
- Medical Test (टेक्निकल पद असल्यामुळे मेडिकल फिटनेस महत्त्वाचा)
RRB Technician नोकरीचे फायदे:
– भारत सरकारचा कर्मचारी असल्याचा अभिमान
– केंद्र सरकारच्या पगारमानानुसार नियमित पगार
– महागाई भत्ता (DA), HRA, TA, पेंशन, LTC इत्यादी सुविधा
– आजीवन सुरक्षा आणि स्थिरता
– प्रमोशनच्या संधी आणि झोन बदलाचा पर्याय
FAQs: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. RRB टेक्निशियन भरती 2025 साठी किती जागा आहेत?
यंदा एकूण 6238 पदांसाठी भरती होणार आहे.
2. कोणती पदं भरली जातील?
टेक्निशियन ग्रेड I (सिग्नल) व टेक्निशियन ग्रेड III या पदांसाठी ही भरती आहे.
3. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2025 आहे.
4. शैक्षणिक पात्रता काय लागते?
ग्रेड I साठी B.Sc किंवा डिप्लोमा, तर ग्रेड III साठी ITI सह 10वी पास आवश्यक आहे.
5. वयोमर्यादा काय आहे?
वयमर्यादा 18 ते 33 वर्षे असून SC/ST/OBC साठी सवलती आहेत.